तुळजापूर, दि. २५: डॉ. सतीश महामुनी

संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिंगा मराठवाडा लोक विकास मंच महा एनजीओ फेडरेशन पुणे आणि जिल्हा माहिती कार्यालय या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामीण भागात मास्क आणि  सॅनीटायझर वितरित करण्यात आले.


 यानिमित्ताने सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली

सालेगाव गुंजोटी नळदुर्ग व बसवंतवाडी येथे गरीब आणि अति गरीब ग्रामस्थांना हे साहित्य वितरित करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती या निमित्ताने देण्यात आली .


देवसिंगा येथे याप्रसंगी अध्यक्ष तानाजी जाधव, नेताजी शिंदे बब्रुवान पारवे तनिष्क जाधव यांची उपस्थिती होती. 

सालेगाव येथील वितरणप्रसंगी सरपंच  नारायण गणपती गुरव, एमडी मोरे अमोल कांबळे भीमसेन माने मनाजी साळुंके हे उपस्थित होते.

गुंजोटी येथे वितरण प्रसंगी सरपंच सरस्वती कार्य ग्रामसेवक विटी मुळे आयुब मुजावर योगेश शिंदे राहुल माने आणि वसंत नगर येथील कोंबडी सेंटर नळदुर्ग येथे वितरण प्रसंगी डॉ. आकांक्षा गोरे , परिचारिका गायकवाड ,निहाल काझी, राठोड गुरुजी हे उपस्थित होते.

 बसवंत वाडी येथे साहित्य वितरण प्रसंगी नेताजी शिंदे उपस्थित होते.
 
Top