लोहारा , दि. ११
लोहारा तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांची आकडेवाडी वाढत आहे.
अशा संकट काळात रुग्णांची वाढ होऊ नये व सध्या जनता कर्फ्यु नागरीक बेभान रस्त्यावर मोकाट फिरत असल्याने महसूल पोलीस व आरोग्य प्रशासनाच्या वतीने
लोहारा शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या लोकांची कोरोना रॅपीड अँटीजन तपासणी करण्यात आली आहे.
शहरातील आझाद चौक जंगदंबा चौकात सकाळपासूनच महसूल पोलीस व आरोग्य प्रशासनाच्या वतीने चौकात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चक्क रस्त्यावर उभे राहून त्यांना रॅपीड अँटीजन टेस्ट तपासणी करायला लावले.
या तपासणीत एकूण जवळपास 65 जणांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये तीन जणांचा अहवाल पॉजेटीव्ह आला आहे.
सदर मोहीम कायमस्वरूपी राबवल्यास कोरोना बांधित रुग्णांचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश येईल. अन्यथा दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी आजच्या मोहिमेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या मोहिमेत तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे,जिल्हा समूह संघटक सतीश गिरी,नायब तहसीलदार डिंगबर स्वामी,भागवत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे, एस एस पांचाळ, हनुमंत पापुलावर, होमगार्ड बिलाल गवंडी, जावेद जेवळे, आरोग्य विभागाचे नाथ फुलसुंदर, मिलिंद गायकवाड, खंडू वाघमारे, विकास थोरात, महादेव सिरसाट,सह महसूल पोलीस व आरोग्य अधिकारी कर्मचारी आदींनी काम पाहिले.
यापुढे मोकाट फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही !
तहसीलदार संतोष रुईकर
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार सध्या जनता कर्फ्यू लागू असताना विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणी केली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये. यापुढे आता गय केली जाणार नाही. तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.