तुळजापूर, दि . ७ :
रेशन दुकान चालवणाऱ्या व्यक्तींना  संसर्गाचा धोका लक्षात घेऊन  विमा संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यात रेशन दुकानदार  यांनी दुकाने बंद करण्याचे आंदोलन सुरू केले आहे .

ऑल महाराष्ट्र शॉपकिपर्स फेडरेशनच्या वतीने रेशन दुकानदारांना सुरक्षाकवच महाराष्ट्र सरकारने तातडीने द्यावी, या मागणीसाठी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शेकडो लोकांच्या संपर्कात येणाऱ्या रेशन दुकानदारांना विमा कवच तातडीने लागू करावे अशी मागणी या निमित्ताने रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने प्रफुल्ल कुमार शेटे यांनी केली आहे.तुळजापूर तालुक्यात 193 रेशन दुकाने आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे एक हजार शंभर रेशन दुकान आहेत यामध्ये सर्वसाधारणपणे सव्वातीन लाख ग्राहकांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण रेशन दुकानदार यांच्या वतीने होत आहे. 

अत्यावश्यक सेवा तसेच विमा कवच याचा विचार करून रेशन दुकानदार यांना राज्य शासनाने तातडीने विम्याचे कवच द्यावे, या मागणीसाठी सदर दुकाने बंद करण्याचा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

यासंदर्भात रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने प्रफुल्ल कुमार शेटे म्हणाले की, शासनाच्या या योजनेमध्ये रेशन दुकान चालवणारी व्यक्ती याचा विचार केलेला नाही. दररोज शेकडो लोकांचा संपर्क आल्यामुळे संसर्गाची भीती दुकानदारांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या दुकानदारांना विम्याचे कवच मिळाले पाहिजे. अत्यंत भितीच्या वातावरणामध्ये रेशन दुकानदार शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे शासनाने देखील गांभीर्याने विमा सुरक्षा देण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
 
Top