चिवरी,दि.२८: राजगुरू साखरे 
कोरोनामुळे भयावह परिस्थिती गावोगावी उद्भवली आहे, दररोज परिसरात मृत्यू होऊन अनेकजण अनाथ  होत आहेत. ज्याच्या खांद्यावर जायचे अशांना स्वतःच्या खांद्यावरही नेता आले नाही. कोरोना महामारीची दुसरी लाट अशी भयंकर आहे की , काही कुटुंबाची कुटुंबे उद्ध्वस्त होत असून या कुटुंबात पाठीमागे अंत्यसंस्कार करण्यासही कुणी राहत नाही. तर ज्या कुटुंबात नातेवाईक आहे अशा कुटुंबांना  आपल्या आप्तेष्टांच्या अंत्ययात्रेलाही जाण्याचे भाग्य लाभत नसुन एकटाच घेऊन जावे या उक्तीचा प्रत्यय येत आहे.



कोरोना लाट येण्या अगोदर कोणी नातेवाईक किंवा मित्र  मत्यु पावला तर दुरदचरचे नातेवाईक ही अंत्यदर्शन घेण्यासाठी व अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी येत होते. परंतु या महामारीच्या लाटेने माणसांचे नाते हे दुर नेले असुन स्वत:च्या आई वडिलांचे अंत्यसंस्कार  करण्यासही मुले व जवळचे नातेवाईक असमर्थता दर्शवत आहेंत. 

यामुळे बाधित झालेल्या रुग्णांना आपल्या नातेवाईक यांच्या हस्ते अंत्यसंस्काराचे भाग्यही लाभत नाही. सरकारी यंत्रणेच्या गाडी मध्येच जावे लागत असून असे वाईट दिवस या कोरोनाने आणले आहे. जवळ असणारी माणसे ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असुन बाधितांना आपला प्रवास हा एकट्यानेच करावा लागत आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून  नगरपरिषद ,महानगरपालिका कर्मचारी मदतीचा हात देत त्यांचा अंत्यसंस्कार करत आहे,

"इथे ओशाळला मृत्यू , झीजली नाती आणि हद्दपार झालीय माणुसकी,' असा प्रत्यय सगळीकडे येत आहे. 


जवळच्या नात्यातील अनेक जण असूनही बेवारस असल्या प्रमाणे सरणाचा आधार घ्यावा लागत आहे मृतानंतर परंपरागत अंत्यसंस्कार विधीहि सध्या करता येत नाहीत, इच्छा असूनही जवळची माणसे मृत व्यक्तीच्या सांत्वनाला भेटीला जाऊ शकत नाही. त्यांच्या पार्थिवावर डोकं ठेवून कोणीही हंबरडा फोडण्यास तयार नाही. 



अखेरची सोबत देण्यासाठी जवळच्या चार लोकांचा खांदाही त्यांना लाभेना. सदैव गर्दीत रमलेल्या काही ना शेवटचा निरोप घ्यायला पोटची मुले ही समोर येऊ शकत नाहीत आयुष्यभर कर्मठपणे कर्मकांड कवटाळणारे अनेकाच्या तोंडात अखेरच्या  शेवटचा क्षणी पाण्याचा घोटही विधिवत पडत नसल्याची पाहावयास मिळत आहे. कोणी पुढे न आल्याने स्थानिक यंत्रणेला त्यांची परस्पर विल्हेवाट लावावी लागत आहे. सर्वांसाठी हे अनुभव विलक्षण वेदनादायी असून सख्या मुलाला आपल्या जन्मदात्यांना अग्नि देता येईना झाले आहे, कुणीतरी त्रयस्थाच्या हस्ते अग्निसंस्कार करण्यात येत आहेत. 

शेवटी काय तर बा विठ्ठला..... काय दिस आले.., मयतीलाही  येईना कोणी, कोरूना च्या धास्तीने जवळचे सोयरे दूर पळू लागले.... अशीच म्हणायची वेळ मानवावर आली आहे.

 
Top