उमरगा, दि.८ :
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्यावतीने दि.७ मे रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती तसेच शेतीविषयक प्रक्रिया उगवण क्षमता या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी उमरगा तालुका समन्वयक अंजना साबळे आणि शितल रणखांब यांनी पुढाकार घेतला
आयोजित प्रशिक्षण शिबिरात स्वयंम संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक बाळासाहेब काळदाते यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले .नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी केले. त्याचप्रमाणे संस्थेचे माधव बोरकट्टे यांनी शेती विषयी मार्गदर्शन करताना अत्यंत कमी खर्चात शेती करण्यासाठी बीज प्रक्रिया उगवण क्षमता पाहणे, तसेच शेतीसाठी गांडूळ खताचा वापर करणे ,सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य द्यावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी 350 नागरिकानी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे महिलाही यात सहभागी झाल्या होत्या.
सदरील प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी स्वयंमचे तालुका समन्वयक अंजना कांबळे,शितल रणखांब,शिल्पा वलदोडे, जोत्स्ना माने आदींनी पुढाकार घेतले.