मुरूम, दि.१७ :
उमरगा तालुक्यातील मुरुम येथे रुग्णाच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे सोमवारी दि. १७ मे रोजी शिवसेनेच्यावतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने वाढती रुग्ण संख्या, रुग्णवाहिकेची कर्मतरता ही समस्या रुग्णांच्या नातेवाइकांना डोके दुखी झाली होती. या परिसरातील तांडया-वस्तीवरील एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला तात्काळ ने- आन करण्यासाठी इथे केवळ एकच शासकीय रुग्णवाहिका होती.
ती अपुरी पडत होती. गंभीर प्रसंगी रुग्णांची गौरसोय होऊन नाहक त्रास सहन करावा लागत होता. खाजगी वाहनातून गरीब रुग्णांना घेऊन जाणे आर्थिक दृष्टया परवडणारे नव्हते. कधी-कधी तर सहजा-सहजी वाहने ही मिळत नाहीत. अतीप्रसंगी नाविलाजात्व घेऊन जाण्याची वेळ आलीच तर गंभीर रुग्णांचे वाटेत काय होईल याची भिती असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल व्हायचे. यासाठी या परिसरातील नागरिकांमधून रुग्णवाहिकेची मागणी असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्ते अजित चौधरी यांनी उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवासेना नेते किरण गायकवाड यांना दिली होती.
त्यांनीही या अगोदर या परिस्थितीचा आढावा घेऊन पाहणी केली होती. ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी या परिसरातील नागरिकांची सोय व्हावी या हेतूने ग्रामीण रुग्णालय, मुरूम येथील रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्काळ नेत्यांनी पुढाकार घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
या रुग्णवाहिकेचे सोमवारी दि.१७ मे रोजी किरण गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवासेना उमरगा तालुका प्रमुख अजित चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे, डॉ कांबळे, युवासेना शहर प्रमुख भगत माळी, रविकिरण आंबुसे, जगदीश निंबरगे, संगमेश कारभारी, नाना टेकाळे आदिंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.