उमरगा, दि.२३ 
देशाच्या सीमेवर राहून देशसेवा केलेल्या माजी सैनिकांना विना अट आणि विना नोंदणी कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी उमरगा तालुक्यातील माजी सैनिकासह शितल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष शितल चव्हाण यांनी केली आहे.


सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वत्र नागरिकांची गर्दी लसीकरण केंद्रावर मोठयाप्रमाणात दिसून येत आहे. तसेच लसीकरण करवून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. लसीकरणासाठी  नागरिकाना मोठया गर्दीत उभे राहवे लागत आहे. त्यामुळे मोठया गैरसोयीला तोंड द्यावा लागत आहे. 

अशा परिस्थितीत  देशाच्या संरक्षणासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या माजी सैनिकांना लसीकरण करवून घेण्यासाठी  गैरसोय होऊ नये त्यामुळे विना अट आणि विना नोंदणीद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .



यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,तहसीलदार यांना उमरगा लोहारा तालुक्यातील माजी सैनिक आणि समाजसेवक शितल चव्हाण यांनी निवेदन दिले आहे.

 यानिवेदनावर शितल चव्हाण, माजी सैनिक बालाजी भद्रे, लक्ष्मण अंगभरे, संजय चोपडे, उमाजी खवडे,करीम शेख,शांतय्या स्वामी, सिद्धेश्वर माने, खाजा शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
 
Top