मुरूम,दि.२३
  उमरगा तालुक्यातील मुरूम येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात दाखल असलेल्या रुग्णांसाठी दररोज प्राणायाम आणि योगासन शिबिर घेण्यात येत असून यासाठी योगशिक्षक नागनाथ बदोले आणि शरद स्वामी मार्गदर्शन करत आहेत.
 दरम्यान योग आणि प्राणायाममुळे मानसिक चिंता दूर होत असून दिवसभरात उत्साह वाटत आहे अश्या प्रतिक्रिया रुग्णाकडून व्यक्त करण्यात येत आहे.


कोरोनाच्या सुरुवातीपासून मुरूम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात कोविड सेंटर सुरू आहे, सध्या येथील कोविड सेंटरमध्ये मुरूम आणि परिसरातील जवळपास 50 रुग्ण दाखल आहेत. येथील रुग्णांच्या सेवेसाठी अनेकांकडून जेवण,अंडी,पुस्तके,इतर साहित्य मदत स्वरूपात पुरवले जात आहेत.

 अशात रुग्णांची मानसिक  चिंता दूर व्हावी आणि आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती उर्जित व्हावी, या उद्देशाने सकाळी योग आणि प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून योग शिक्षक नागनाथ बदोले आणि शरद स्वामी हे कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेट देवून शासकीय नियमांचे पालन करत रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत.


योग, प्राणायाम केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

शरद स्वामी ,योग शिक्षक

योग आणि प्राणायाम केल्याने आरोग्यात सुधारणा येते मानसिक तणाव नाहीसे होते, उत्साह आणि ऊर्जा कायम असते  कोरोनासारख्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी बळ मिळते त्यामुळे  शासनाने नियम अटी लावून सर्वच नागरिकांच्या आरोग्य स्वास्थसाठी  योग आणि प्राणायाम केंद्र चालू  ठेवण्यास परवानगी द्यावी -


 
Top