काटी,दि.२४ 
काटी ता. तुळजापूर  येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेचे  प्रभारी मुख्याध्यापक 
तानाजी शेळके  यांच्या पत्नी सौ . आंजली तानाजी शेळके वय  38 यांचे शुक्रवार दि.14 रोजी पहाटे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान  निधन झाले. 


त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी, आई वडिल, सासु, सासरे, दिर, जावा,पुतणे, विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे.


मागील सहा दिवसांपासून त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू  होते. अखेर सहा दिवसानंतर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. सेवानिवृत्त शिक्षक तथा माजी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संदिपान साळुंके यांच्या त्या कन्या होत्या. त्याचबरोबर  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते तानाजी शेळके यांच्या त्या  पत्नी होत.
   त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी त्यांच्या मुळगावी दहिटणे (ता.बार्शी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकस्मात मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
        
 
Top