उस्मानाबाद ,दि.१४
शुक्रवार दि. १४ मे रोजी संताजी सेना महाराष्ट्र शाखा उस्मानाबाद च्यावतीने सहयाद्री ब्लड बँक उस्मानाबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले .
यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केले,या प्रसंगी सचिन राऊत , डॉ. शशिकांत करंजकर ,प्रदीप पोंदे यांची प्रमुख पाहुणे व संताजी सेनाचे प्रदेशाध्यक्ष श्रीराम मुंबरे, मराठवाडा संघटक भुपेश भांडेकर , जिल्हाध्यक्ष दीपक नाईक, कार्याध्यक्ष नागेश निर्मले , उपाध्यक्ष उमाकांत देशमाने, हरीश निर्मले, तालुकाध्यक्ष कैलास अडसुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.