तुळजापूर, दि. १९ : डॉ. सतीश महामुनी
आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची आपली परंपरा आहे, ही परंपरा डोळ्यासमोर ठेवून तुळजापूरच्या श्री स्वामी समर्थ बचत गटाने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळी व रात्रीच्या भोजनासाठी मोफत डबा देण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. चचंला बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री.स्वामी समर्थ बचत गट तुळजापूर यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील कोरोना रुग्णांनाच्या १०० नातेवाईकांना मोफत जेवण देण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना डबा देण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व गरजेचा आहे. या काळात याचे खूप मोल आहेत. या सर्व कामामध्ये सहकार्य करणाऱ्या युवकांचे चंचला बोडके यांनी कौतुक केले आहे.
यावेळी बचत गटाचे पदाधिकारी व सभासद गुरुराज डोंगरे, विक्रम कदम,तोफीक तांबोळी,नानासाहेब डोंगरे,इम्रान शेख, सौरभ कदम,गणेश पवार,शादाफ शेख, दत्ता लोखंडे,हैदर शेख, ,प्रितेश डाके सत्यजित डोंगरे व मित्र परिवार उपस्थित होते .
श्री स्वामी समर्थ बचत गट संयोजक गुरुराज डोंगरे यांनी सांगितले की, हा उपक्रम पुढील १५ दिवस सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोन वेळ चालणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर सर्व संचारबंदीचे वातावरण असल्यामुळे व गावाकडे जाण्यासाठी वाहनाची सोय नसल्यामुळे तारांबळ होत आहे. ही नातेवाईकांची तारांबळ दूर करण्यासाठी या आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून बचत गटाने हा समाजोपयोगी उपक्रम चालवल्याचे सांगितले.