काटी,दि.१९ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कालिदास मलिकार्जून देवकर वय 50 वर्ष यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
मागील वर्षी थोरले भाऊ विलास देवकर व त्यांच्या पत्नीचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. देवकर कुटूंबियांवर वर्षेभरात हा तिसरा आघात झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.