तुळजापूर, दि. २१ : 
संस्कार भारती तुळजापूर संस्थेचे माजी अध्यक्ष अंबऋषी शिंदे यांचे वार्धक्याने  बाभळगाव ता. बार्शी येथे नुकतेच निधन झाले. 

शिंदे गुरुजी यांच्या निधनामुळे एका संगीत तज्ञाला मराठवाडा पोरका झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे .

जिल्हा परिषद प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि तुळजापूर संस्कार भारतीचे अकरा वर्षे अध्यक्ष राहिलेले संगीततज्ञ अंबऋषी शिंदे गुरुजी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर बाभळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संस्कार भारती तुळजापूर आणि शनिवार संगीत मंडळाच्यावतीने सर्व कलावंतांनी शिंदे गुरुजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे.
 
Top