उमरगा, दि.३० :
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या साने गुरूजी नगरमधील पतंगे रस्ता ते एकोंडी रस्त्यावर दररोज नालीचे घाण पाणी साचल्याने घाण पाण्यातुनच नागरिकांना ये-जा करावी लागत असून नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
नवीन जलवाहिनी टाकण्याचे कामासाठी ज्या नळाला पाणी येत होते ते ही पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यापासुन ते काम स्थगित असल्याने या भागातील नळाला पाणी येत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचे नागरिकानी सांगितले .
पतंगे रोडवरून उपविभागीय पोलिस अधिकारी व तलाठी कार्यालयासह अजय नगर,महात्मा बसवेश्वर विद्यालय,जकापूर काॕलनी या भागातील नागरिकाना सर्व शासकीय कार्यालयासाठी हाच मार्ग आहे. या रस्त्यावरून नगरपरिषद, तहसिल, कोर्ट,पंचायत समिती,आदर्श विद्यालय गटशिक्षण कार्यालयासह विविध ठिकाणी जाणारा ह्दारीचा प्रमुख रस्ता वर्दळीचा झाला आहे. मात्र रस्त्यावर नेहमी घाण पाणी साचलेले असते.
पोलिस निवासस्थानातुन बाहेर येणाऱ्या पाण्याला योग्य निचारा करण्यासाठी नालीचे काम झालेले नाही. त्यामुळे घाण पाणी जवळपास दोनशे ते तीनशे मीटर पर्यंत रस्त्यावर साचत आसल्याचे दिसुन येत आहे. अक्षरशः तळ्यातूनच मार्ग काढत चाचपडत जावे लागत असल्याने चालत जाणे तर शक्यच नाही व घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी सिंमेंट रस्ता खोदुन महिन्याचा कालावधी लोटला. पालिकेकडे पाईप्स् उपलब्ध नसल्याने काम पूर्ण केले जात नसल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी हाल होत आहेत.
जवळपास दोन महिने पाणी नाही संबधित नागरिक नगर परिषदेकडे विचारणा करण्यासाठी गेले असता अरेरावी भाषा वापरली जात असल्याने नागरिक वैतागले असुन
दुरुस्तीच्या कामात दिरंगाई का केली जात आहे, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करुन आपला रोषा व्यक्त करीत आहेत.
या भागातून येजा करत असताना झाडे झुडपा बरोबरच लाईटच्या उघड्या डीपी मुळे नागरिकांचे आरोग्यच नाही तर जिव ही धोक्यात आला आहे