काटी , उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील 
धोत्री  येथील दारिद्र्य रेषेखालील 30 गरीब कुटुंबीयांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून या घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.


राज्य शासनाने दारिद्रय़रेषेखालील गरीब कुटुंबीयांसाठी रमाई घरकुल आवास योजना नोव्हेंबर 2008 साली सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दारिद्रय़रेषेखालील लोकांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांना राहण्या करिता घराची सोय उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्या घराच्या कच्च्या जागेवर त्यांना पक्की घरे बांधून देणे ही कामे करण्यात येतात.

दारिद्रय़रेषेखालील लोकांना राहण्याकरिता चांगली घरे बांधून देणे हा शासनाचा हेतू आहे. त्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत मार्फत सरपंच अश्विनी साठे, ग्रामसेवक भिमराव झाडे, पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, रोजगार सेवक सुनिल मस्के, सामाजिक कार्यकर्ते दत्ता उबाळे यांनी गावातील रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करून 30 घरकुल मंजूर केली असून या घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांतसिंह मरोड यांच्यासह घरकुल योजनेतील पंचायत समितीचे डेटा एन्ट्री ऑपरेटर संजय पवार, कनिष्ठ सहाय्यक डी.बी. शितोळे,आशिष तानवडे यांनी सहकार्य केले. हक्काचे कुठलेही घर नसल्याने कोरोना कालावधीत व पावसाळ्याच्या तोंडावर, आपल्याला हक्काचे घर, हक्काचा निवारा मिळाल्याने 30 लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
 
Top