नळदुर्ग, दि. ३० :
येडोळा ता.तुळजापूर या गावात संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान महसुल ,आरोग्य , पोलिस प्रशासनातील आधिक-यानी या गावास भेट दिली आहे.
तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावाची लोकसंख्या १ हजार ६६६ असुन त्यापैकी १ हजार २०० मतदार आहेत. हे गाव नळदुर्गच्या दक्षिणेस असुन जखणी तांडा,गायरान व अन्य एक तांडा असे येडोळा गावात समावेश आहे. सुरुवातीस काही प्रमाणात कोरोना बांधित रुग्ण आढळुन आल्याने प्रशासकीय यंञणा अलर्ट झाली. सध्या एकुण बाधित ५३ रूग्ण असुन ते नळदुर्ग, तुळजापूर, उमरगा येथिल कोविड सेंटरमध्ये तर काही इतर ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
येडोळा ता. तुळजापूर येथे दि. १५ मे रोजी पहिला बाधित रूग्ण आढळला.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व ही साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल जानराव, डॉ. एम. एम शेख, व आरोग्य कर्मचा-यांनी येडोळा येथील जि.प. प्राथमिक शाळेत दि. 22 मे ते 26 मे दरम्यान 152 ग्रामस्थांची रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट केली. त्यापैकी ४० जण बाधित आढळुन आल्याने सर्वञ खळबळ उडाली. यामुळे येडोळा गाव हॉटस्पॉट ठरल्याने तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यासह महसुल, अरोग्य व पोलिस प्रशासनातील कर्मचा-यांनी येडोळा गावास भेट दिवून माहिती जाणून घेतली. त्यानंतरही तपासणी केली असता १३ रूग्ण बाधित आढळल्याने एकुण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५३ झाली आहे.
महादेव अकुंश पवार,शिवसैनिक ,येडोळा ता.तुळजापूर
कोरोनाबद्दल कोणीही फारसे गांभिर्य
दाखवले नाही. आशातच काहीनी कार्यक्रम घेतले,त्यास बाहेर गावचे नागरिक गावात येवुन गेले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आज भितीने बहुतांश कुटूंबिये आपला संसार रानातच (शेतात) थाटलयं.
सरपंच पद्माकर पाटील,येडोळा
गावात बांधित रुग्णाची संख्या ५३ वर पोहचल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन ग्रामपंचायती च्यावतीने संपुर्ण गाव निर्जंतुकी करण्यासाठी फवारणी करण्यात आली आहे. तसेच मास्क व साॕनिटायझरचे ग्रामस्थाना वाटप केले आहे. मी वैयक्तिक रुग्णालयात उपचार घेत असलेल्य गावातील रुग्णास प्रत्यक्ष भेट देवुन त्याचे मनोबल वाढवत आहे.