तुळजापूर, दि. १७ : 
महागाईमुळे सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे, अडचणीच्या आणि आपत्तीच्या काळात देखील केंद्र सरकार  महागाई नियंत्रणात  आणण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.  

ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाल्याचा ठपका ठेवून तुळजापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जोरदार  निदर्शने तुळजापुरात करण्यात आली. पेट्रोल पंप आणि खताचे दुकान येथे घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल, खत दरवाढ करून सामान्य नागरिकांना अडचणीत आणले या सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तुळजापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडुन  आंदोलन करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजापूर येथील पेट्रोल पंपावर नागरिकाना व ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध नोंदवला. 

प्रचंड मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असताना केंद्र सरकार महागाई नियंत्रणावर ते अपयशी ठरल्याची टीका यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून भाववाढ कमी करा अशी मागणी करण्यात आली.



यावेळी  विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम,  राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, विद्यार्थी मराठवाडा उपाध्यक्ष स्वप्नील माने, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष दुर्गेश साळुंके, उपाध्यक्ष मकसूद शेख, कार्याध्यक्ष गोरख पवार, महेश चोपदार,गणेश नन्नवरे ,कार्याध्यक्ष शरद जगदाळे,उपाध्यक्ष समाधान ढोले,व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार,विद्यार्थी तालूका अध्यक्ष रोहित चव्हाण,ओबीसी तालुका अध्यक्ष विकी घुगे, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी,कार्याध्यक्ष अनमोल शिंदे,समर्थ पैलवान आदी. उपस्थिती होते.
 
Top