तुळजापूर,  दि.१६ : डॉ.सतीश महामुनी

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी तुळजापुर तालुक्यातील काटगाव येथील लहुजी शक्‍ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ  कांबळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या पत्नी सरपंच श्रीमती नगीनाताई कांबळे यांनना पत्र लिहून श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबाला आधार देत मुलांची काळजी घेण्यास सूचित केले आहे.



या पत्रात असे म्हंटले आहे की,
सोमनाथ  कांबळे यांच्या निधनाने अतिशय धक्का बसला,कोरोनाच्या साथीने तसोमनाथ कांबळे व त्यांच्या बंधूचे निधन होणे हे अतिशय वेदनादायी आहे, मातंग समाजातील युवा नेतृत्व म्हणून सोमनाथ  यांचा लौकिक होता.

राज्यभर त्यांनी आपल्या संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते, काळाने असा अचानक घाला त्यांच्यावर घातला आणि आपण सारेच सातत्याने समाजासाठी चिंतन करणार्‍या प्रचंड परिश्रम करणाऱ्या नेत्याला मुकलो आहोत, मी त्यांना माझी वैयक्तिक आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

 हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती आपल्याला मिळो अशी प्रार्थना करतो या पत्राद्वारे सरपंच श्रीमती नगीना सोमनाथ कांबळे यांनी स्वतःची आणि दोन्ही मुलांची काळजी घ्यावी असा संदेश राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी श्रीमती नगीना कांबळे यांना पत्र लिहून दिला आहे.
 
Top