तुळजापूर, दि.१६ : डॉ. सतीश महामुनी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गरजू नागरिक आणि कोरोना रुग्णांना भोजन देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, मनसेचे जिल्हा प्रमुख अमरराजे परमेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजन वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.


दि.१६ मे  रोजी तुळजापूर शहरातील १२४ व १०८ खोल्यांचे कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्ण व आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यासह गरजु नागरिक असे मिळुन जवळपास पाचशे लोकांना भोजन वाटप करण्यात आले.
 मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम परमेश्वर, पत्रकार सचिन ताकमोघे, रोहित कावरे , शहराध्यक्ष प्रमोद कदम, मनविसे जिल्हाध्यक्ष सुरज कोठावळे, तालुका संघटक उमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, झुंबर काळदाते,शहर उपाध्यक्ष वेदकुमार पेंदेसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

तुळजापुरात या आपत्तीच्या काळात लोकांना मदत करण्याची खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. गोर गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे अर्थकारण ठप्प झाली आहे. या कठीण परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीला जाण्यासाठी पक्षप्रमुख राज  ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 
त्यानुसार तूळजापूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  लोकांना भोजन देण्याचा उपक्रम करण्यात आला आहे.
 
Top