संग्रहीत फोटो

तुळजापूर,  दि. १६ :

खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याचे अत्यंत धक्कादायक आहे.  महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा आधार यानिमित्ताने  आमच्या पासून दूर गेल्याची  भावना काँग्रेसचे युवा नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली.


 खासदार राजीव सातव हे दरवर्षी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरला येत असत. काँग्रेस नेते ॲड. धीरज पाटील, किशोर गंगणे, लखन पेंदे, तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यानंतर मंदिर कार्यालयात खासदार सातव यांचा सत्कार केला. 
काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण यांनी या निमित्ताने तीव्र शब्दात दुःख व्यक्त करत खूप मोठे नुकसान झाल्याची भावना बोलून दाखवली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या वतीने खासदार सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली.


तुळजापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर मगर म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा तरुण चेहरा आमच्यातून निघून गेला आहे, खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, जि. प. सदस्य बाबुराव चव्हाण, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, नगरसेवक सुनील रोचकरी, युवक नेते रणजीत इंगळे, युवक नेते आनंद जगताप, युवक नेते लखन पेंदे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
 
Top