नळदुर्ग,दि.२८ :
शहरात घरोघरी स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट,प्रखर देशभक्त, विज्ञानवादी, समाजसुधारक, कवी, लेखक, स्वा.वि.दा. सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्त शहरात घरोघरी प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी न करता घरीच राहून स्वातंत्र्यवीरांचे पूजन व्हावे म्हणून ,स्वा.सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी गुरुवारी प्रतिमेचे वितरण केले होते,व घरोघरी पूजन करावे असे आवाहन केले होते, आज मोठ्या उत्साहात घरोघरी स्वा.सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.