नळदुर्ग, दि. २८ :
शहरातील सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव लक्ष्मण गव्हाणे वय ७९ वर्ष ,यांचे राहत्या घरी अल्पशा अजाराने शुक्रवार दि. २८ मे रोजी दुपारी सव्वा चार वाजता निधन झाले. ते नळदुर्ग शहर शिवसेना मिडीया प्रमुख सुनिल गव्हाणे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता गवळी गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांचे निधन झाल्याचे समजताच शिवसेना कार्यकर्ते, विविध मंडळाचे पदाधिका-याकडून श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.