मुरूम, दि.२८ :
उमरगा तालुक्यातील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याजवळील कोविड सेंटरमध्ये जावून बाळासाहेब वाघमारे यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी दि.२८ मे रोजी दुपारचे भोजन देवून साजरा करण्यात आला.
गावठाण तुंगाव, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब वाघमारे यांनी कोविड सेंटरमध्ये जावून रुग्ण व नातेवाईकांना दुपारचे पोष्टीक भोजन देवून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविले. या निमित्ताने सेंटरमध्ये जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉ.कांबळे, महादेव घंटे, एजाज शेख, अशोक गोडबोले, प्रसन्न कांबळे आदी कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार मुरूम काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, सतिश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सध्याची गरज ओळखून, सामाजिक बांधिलकीचे भाव ठेवून वाघमारे यांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.