कळंब , दि. 02  
बियर बारच्या गोडावून मधील विदेशी दारूचे जवळपास एकोणीशे बॉक्स अंदाजे किंमत पावणे तीन लाख रूपयेचा मुद्देमाल चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडल्याने कळंब शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आज्ञात चोरटयाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


कळंब येथील ‘सागर बियर बार ॲन्ड मरमीट रुम’ च्या गुदामाचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि.  30 एप्रिल .रोजी दरम्यानच्या रात्री तोडून आतील विदेशी दारुचे 1,हजार 893 बॉक्स अंदाजे किंमत  2 लाख 86 हजार 837  सह सीसीटीव्हीचा डीव्हीआर व किराना साहित्य चोरुन नेले. तसेच आतील फर्निचरची तोड-फोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या बियर बार मालक- प्रदिप योगीराज मेटे, रा. कळंब यांनी 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top