उस्मानाबाद,दि.०२ :
जिल्हयात तीन ठिकाणी चोरटयांनी धुमाकुळ घालून रोख रक्कम, मोबाईल, बांधकामाचे साहित्य, 80 पोते हारभरा असे मिळुन एक लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेल्याच्या घटना घडले आहेत. याप्रकरणी आज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील युवराज बप्पासाहेब पिंगळे, रा. डिकसळ, ता. कळंब यांच्या गावातील घर बांधकामावरील लोखंडी सळई- 60 कि.ग्रॅ., बांधकामाचे लोखंडी प्लेटा- 40 नग असे एकुण 27,600 ₹ किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 30.04.2021 ते 01.05.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या युवराज पिंगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुस-या घटनेत उस्मानाबाद (ग्रा.): फय्याज शबीर पठाण व दिलदार पठार, दोघे रा. अंबेहोळ, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 28- 29.04.2021 दरम्यानच्या रात्री अंबेहोळ शिवारातील पत्रा शेडमध्ये झोपलेले असतांना दोरीवरील त्यांच्या विजारीच्या खिशातील एकुण 30,000 ₹ रोख रक्कम व चार्जींगला लावलेले दोन भ्रमणध्वनी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फय्याज पठाण यांनी 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अन्य एका घटनेत संकेत सुर्यभान सुर्यवंशी, रा. उस्मानाबाद यांच्या सकनेवाडी शिवारातील ‘सुर्यतेज फार्मस प्रोड्युसर लि. कंपनी’ या दुकानाच्या खिडकीचे गज अज्ञात व्यक्तीने दि. 30.एप्रिल ते 01 मे दरम्यानच्या रात्री कापून आतील खरेदी केलेला 80 पोती हरभरा चोरुन नेला. अशा मजकुराच्या संकेत सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.