उस्मानाबाद,दि.३१ : 

 पोलीस ठाणे, मुरुम: 1)श्रीनिवास शंकरराव कणकधर, रा. सालेगाव 2)दत्तात्रय श्रीपती लाळे, रा. कोराळ हे दोघे दि. 30 मे रोजी कोराळ शिवारातील राम माडजे यांच्या पत्रा शेडमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) बाळगलेले असलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, उमरगा: अनिल राजकुमार तेलंग, रा. बस्वकल्याण, राज्य- कर्नाटक हे दि. 30 मे रोजी कोळसुर, ता. उमरगा शिवारातील एका पत्रा शेडसमोर 20 लि. शिंदी (किं.अं. 1,700 ₹) अवैधपणे बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top