पोलीस ठाणे, परंडा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जिल्ह्यात विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही 1)तानाजी मारुती सोनमाळी, रा. वाकडी, ता. परंडा 2)सफीक चाँद शेख, रा. वारदवाडी, ता. परंडा या दोघांनी दि. 30 मे रोजी 14.45 वा. सु. वारदवाडी चौकातील आपापले हॉटेल व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम- 51 (ब) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top