उस्मानाबाद ,दि.३१
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील रस्त्यावर दि. 28 मे रोजी 13.00 वा. सु. एका महिलेकडून तीच्या स्कुटरचा धक्का अजय दशरथ काळे, रा. तुळजापूर नाका यांना लागला. यावेळी अजय काळे यांनी त्या महिलेच्या स्कुटरची चावी काढून घेतली असता तेथे उपस्थीत असलेले नाना शिवाजी पेठे, रा. तुळजापूर नाका यांनी तसे न करण्यास अजय काळे यांना विनंती केली.
यावर अजय काळे यांसह विशाल काळे, अजय काळे अशा तीघांनी संगणमताने नाना पेठे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नाना पेठे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.