येरमळा ,दि.३१:
पोलीस ठाणे, येरमाळा: येरमाळा पो.ठा. हद्दीतील एका 35 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) दि. 30 मे रोजी 16.17 ते 19.13 वा. दरम्यान एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन व्हाट्सॲपद्वारे अश्लील संदेश येउ लागले. तो क्रमांक परिचयाचा नसल्याने आपल्यास कोणीतरी जाणुनबुजून त्रास देत असल्याचे त्या महिलेस समजले. यावर त्या महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात मोबाईल क्रमांक धारक व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 354 (ड) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67, 67 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.