काटी,दि.३१ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या सहकार्याने सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे आदींसह सर्व ग्रा.प.सदस्य, स्थानिक पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून गावासह जवळील दहिवडी, वाणेवाडी,खुंटेवाडी येथील 45 वर्षापुढील दोनशे पन्नास जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नोंदणी कक्ष, शिक्षक आणि आरोग्य सेवक, शिक्षक वृंद, आशा कार्यकर्ती, लसीकरण कक्षा बाहेर टेबल मांडून आधार कार्ड तपासणी, नागरिकांची नोंदणी करुन टोकन देण्यात येत होते. शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण का आवश्यक आहे, याबाबत नागरिकांना माहिती समजावून सांगत होते. या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून येथील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या व कोरोनामुळे काटीसह परिसरातून झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आणखी पाचशे डोसचे लसीकरण तात्काळ होणे गरजेचे असल्याचे सरपंच आदेश कोळी आणि ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी मत व्यक्त केले.
या लसीकरण मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉ.अजित राठोड, सी.एच.ओ. डॉ.नदाफ सर्फराज, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, विस्तार अधिकारी वैरागे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, कृषी अधिकारी अशोक काळे, केंद्र प्रमुख सोलंनकर, हवलदार गिरी, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक वृंद, सर्व ग्रा.प. सदस्य, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.