उस्मानाबाद,दि.३१ : 
शहरातील रोटरी सेवा ट्रस्ट,रोटरी क्लब,लघु उद्योग भारती,धारासुर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्था संघ,आर्ट ऑफ लिव्हिंग,सन ग्रुप आदींच्या अर्थिक सहकार्यातून दहा ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटर मशिन्स  जिल्हा शासकीय रुग्णालयास जिल्हाधिकारी डाँ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या  उपस्थितीत  सोमवार दि.३१ मे रोजी जिल्हा  सुपुर्द करण्यात आले.


 
रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या वतीने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी स्वामी , जिल्हा शल्यचिकित्सक रो. डॉ. धनंजय पाटील , डॉ. सचिन देशमुख, रोटरी क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष रो. अमरसिंह देशमुख, सचिव रो. इंद्रजित आखाडे यांच्या उपस्थितीमध्ये  जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. जेष्ठ रो. रविंद्र साळुंके  यांच्या मार्गदर्शना नुसार सर्व रोटरी सदस्यांनी निधी उभारणीचे काम केले.


रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने पर्यावरण रक्षण व ऑक्सिजनच्या वाढीसाठी दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा उपक्रम घेतला जातो. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकट काळामध्ये याच ऑक्‍सिजनचा रुग्णांना तुटवडा जाणवू लागल्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या वतीने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. 


सदर मशीन 5 लिटर क्षमतेचा असून एका मशीनचा उपयोग 2 रुग्णांना उपचार करण्यास मदत होऊ शकते.
या सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब उस्मानाबादचे आजी-माजी सदस्य विविध संस्था यांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे. यामध्ये
 राजकुमार अजमेरा, योगिता अजमेरा, संतोष शहा, राजेश कुलकर्णी, अमित साळुंके, अमर देशमुख, संजय देशमाने, प्रदीप मुंडे, उल्हास गपाट, संतोष शेटे, संजय शेटे,  धारासूरमर्दिनी महिला  फेडरेशन
अध्यक्ष सौ संगीता प्रविण काळे या सदस्यांबरोबरच
, आर्ट ऑफ लिव्हिंग, लघुउद्योग भारती, सन ग्रुप अशा संस्थांनी देखील आर्थिक मदत या कार्यासाठी केली, निल डिस्ट्रीब्यूटर सोलापूरचे इंद्रनील जोशी यांनी या मशिन उपलब्ध करून दिल्या.


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख यांनी केले.तर आभार रोटरीचे सचिव इंद्रजित आखाडे यांनी मानले
 
Top