प्रतिकात्मक कार्टुन

मुरुम, दि. 27 
 आलुर तांडा, ता. उमरगा येथील व्यंकट व सुनिल व्यंकट राठोड या दोघा पिता- पुत्रांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 26 मे रोजी 01.30 वाजण्याच्या सुमारास तांड्यावर गावकरी  प्रकाश तुकाराम चव्हाण यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांड्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा, दि. 27 
नागराळ, ता. लोहारा येथील उमाकांत शेषेराव गोरे हे दि. 25 मे रोजी 20.15 वा. सु. लोहारा येथील आपल्या टेलरिंग दुकानासमोर होते. भाऊ- रमेश गोरे यांनी, “ तु माझ्या बारकडे नेहमी का येतोस तुझे काय काम आहे.” असे उमाकांत धमकावून शिवीगाळ करुन कत्तीने मारहान करुन जखमी केले. तसेच कत्तीचा धाक दाखवून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नागराळ गावातील दत्त मंदीरामध्ये बसवून ठेवले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उमाकांत गोरे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 343, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top