उस्मानाबाद, दि. 27 
 चंद्रकांत राजाराम इंगळे, रा. राजुरी, ता. उस्मानाबाद यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 6200 सह डीकीतील ॲपटेक कंपनीचे बिलींग यंत्र दि. 22.05.2021 रोजी 12.00 वा. सु. शासकीय जिल्हा रुग्णालय परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या चंद्रकांत इंगळे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



 तुळजापूर, दि. 27 
भारत मोतीचंद गडदे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर यांच्या तुळजापूर- लातूर पर्यायी मार्गावरील चहा टपरीचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 25- 26.05.2021 दरम्यानच्या रात्री तोडून आतील गॅस टाकी, खाद्य पदार्थ व 2,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या भारत गडदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top