लोहगाव ,दि.१३ :
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे गुरुवार दि१३ रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते महेबूब शेख यांच्या वतीने रमजान ईदचे औचित्य साधून गावातील गरीब गरजू लोकांना किरणा साहित्याचे किट सरपंच सौ.लोचनाताई रविंद्र दबडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले,
कोरोना महामारीमुळे यंदा रमजान ईद साध्या पध्दतीने साजरी करणार असून इतर खर्चास फाटा देवून गरीब लोकांना मदत करून ईदचा आनंद साजरा करत असल्याचे महेबूब शेख यांनी बोलताना सांगीतले.
यावेळी रविंद्र दबडे, महेबूब शेख, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, यलप्पा गायकवाड, हणमंत लांडगे, बालाजी दबडे, अरविंद दबडे आदि उपस्थित होते,