लोहारा,दि.२०
 मार्डी ता.लोहारा येथील गायरान जमिनीवर बेकायदेशिर  अतिक्रमण करणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी करुन  अतिक्रमण हटविण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे  की, लोहारा तालुक्यातील  मार्डी  या गावच्या शिवरामध्ये शासनाची वीस ते पंचवीस एकर गायरान जमीन असून सदर या गायरान जमिनीचा सातबारा शासनाच्या नावे आहे.  तसेच या गायरान जमिनीवर गावातील  मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील तसेच अल्पभूधारक नागरिक आपली जनावरे या गायरान जमिनीवर आपले पशुधन जगवतात. तसेच गावातील काही  लोकांनी या शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे.  


 शासनाच्या गायरान जमिनीवर   नांगरुन आप आपल्या पद्धतीने कब्जा करीत आहेत.  गायरान जमिनीवर मोठमोठी पेंडॉल शेड पत्र्याचे मारले जात आहे. सदर वीस ते पंचवीस एकर जमीन हे शासनाचे असून तसा सातबारा देखील शासन दप्तरी नोंद आहे. तसेच या  जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने मागासवर्गीय लोकांची तसेच  आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे जनावरे गायरान जमिनीवरील  कुरण चारण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे  या  जमिनीवर पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी झाडे सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आले होते. त्या झाडांची सुद्धा कत्तल केली जात आहे .   जमिनीवरील अतिक्रमण होत असल्याने तात्काळ सर्व लोकांच्या जनावरासाठी खुले करून द्यावी ,अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने  आंदोलन करण्यात येईल. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी तात्काळ शासनाच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढल्यास दि. ५ जून रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत. 

या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांची सही आहे.
 
Top