जळकोट,दि.२०:
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे कोरोना महामारीत रूग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी जळकोट ग्रापंचायतच्यावतीने येथील जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटरचे सुरु करण्यात आले.
जळकोट ता. तुळजापूर या गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हजारा पेक्षा आधिक आहे. जळकोट गावाशी दररोज दहा ते पंधरा गावच्या नागरिकांचा संपर्क आहे.
सदरील सेंटर चालु करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील यांनी पाठपुरवठा केला .
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, पंचायत समितीच्या सभापती रेणुका इंगोले, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास पवार, बसवराज कवठे,महेश कदम, कृष्णात मोरे, ग्रा.प.सदस्य गजेंद्र पाटील, अंकुश लोखंडे, जीवन कुंभार,कल्याणी साखरे ,पिंटू कागे,राजु पाटील, बबन मोरे,नारायण पटणे, नरसिंग हिडोळे, नितीन माळी, महादेव सावंत, अर्जुन कदम, विजय यादगौडा, सुनील माने, जितु पाटील, विठु कदम, प्रवीण पाटील,डॉ विष्णू सातपुते,उप अभियंता ए.आर.खान, विस्तार अधिकारी सर्जे, ग्रामविकास अधिकारी जे.के.पारे उपस्थित होते.