तुळजापूर,दि.१४
रुग्णालयात उपचार घेणा-या सर्व सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय दुर करण्यासाठी जवाहर मंडपचे दत्तात्रय भोसले यांच्यावतीने
विश्रांती कक्ष उघडण्यात आले आहे. या प्रेणादायी कार्यामुळे त्यांचे आभिनंदन होत आहे.
येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे नातेवाईक हे दररोज रुग्णालया समोरील महामार्गाच्या कडेला उघड्यावर झोपतात, काही दिवसापासुन पावसाचे वातावरण आहे व काही दिवसात पावसाळा सुरु होईल, सदरची बाब लक्षात घेऊन जवाहर मंडपचे दत्तात्रय भोसले यांनी रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्याशी या बाबतीत चर्चा केली असता त्यांनी समाधान महराज परमेश्वर यांच्या माध्यमातुन रुग्णालय समोरील दर्याप्पा मुळे यांची खुली जागा उपलब्ध केली,
याच ठिकाणी जवाहर मंडपचे भोसले यांनी लाईट, फँन, चटई, मोबाइल चार्जिंग पाँइंटसह आदी सुविधा उपलब्ध करून मंडप तयार केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या मंडपास भेट दिली.
त्यांच्या वतीने याठीकाणी ठेवण्यसाठी फोल्डींगचे 20 बेड तत्काळ उपलब्ध करून दिले. आज या विश्रांती कक्षाचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ चंचला बोडके , डाँ. श्रीधर जाधव , समाधान महाराज परमेश्वर, दत्तात्रय भोसले, दर्यप्पा मुळे, सचिन बिराजदार, प्रभाकर देवकर, व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले उपस्थित होते.