तुळजापूर, दि. १४: डॉ. सतीश महामुनी

कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मृत्यु  झालेल्या त्या व्यक्तीच्या अत्यंविधीसाठी कुटूंबाची होणारी हेळसांड थाबविण्याकरिता व मयत व्यक्तीची अत्यंविधी सन्मानपुर्वक करता यावी यासाठी नगराध्यक्षासह नगरसेवकानी पुढाकार घेवुन स्वखर्चाने  करणार अत्यंविधी.    त्यामुळे पिडित कुटूंबाना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया शहरवासियातुन व्यक्त केले जात आहे.



 रुग्ण मरण पावलेल्या व्यक्तीच्या  कुटुंबांना अंत्यविधीसाठी  हाल होत आसल्याचे पाहुन  नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक विनोद गंगणे, नगरसेवक पंडित जगदाळे आणि समाजसेवक आनंद कंदले आदिनी या दुःखद प्रसंगांमध्ये पीडित कुटुंबांना सहकार्य करण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेतले.
 अंत्यविधी होणारा विलंब , त्रास लक्षात घेऊन अशा रुग्णांचा अंत्यविधी सन्मानपूर्वक करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशा रुग्णांच्या अंत्यविधीसाठी लागणारा सर्व खर्च आणि साहित्य या मान्यवर मंडळीकडून करण्यात येणार आहे.

अनेक अडचणी, मनावरील दडपण, संसर्गाची भीती, कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्याचे दुःख अशा अवस्थेमध्ये अनेक कुटुंबांची या काळात खूप मोठी फरफट होत आहे. इतर प्रसंगांमध्ये एकमेकांना मदत करणारे हात या काळात नसल्यामुळे ज्या कुटुंबामध्ये रूग्ण दगावला आहे. त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

ही बाब जाणवल्यामुळे  नगराध्यक्षासह नगरसेवक    एकविचाराने या अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंत्यविधीसाठी लागणारे सरपण आणि इतर साहित्य याची जमवाजमव केली आहे.  हे सर्व साहित्य अपसिंगा रोड येथील स्मशानभूमीमध्ये उपलब्ध करून दिले आहे. अशी माहिती माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी दिली.

यानिमित्ताने नगरसेवक पंडित जगदाळे म्हणाले की आम्ही एकत्रित विचार करून कोणत्याही परिस्थितीत दुःखद घटनेतील   कुटुंबाना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व नियोजन केले आहे. प्रशासनाला देखील याचा त्रास होऊ नये, याची काळजी घेतली आहे. जेणेकरून या अत्यंत संवेदनशील प्रसंगांमध्ये कुटुंबातील व्यक्ती गमावल्यानंतर होणारा त्रास त्या कुटुंबाला होऊ नये याची खबरदारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहोत असे सांगितले.
 
Top