वाढदिवसाच्या आनावशयक खर्चाला फाटा देवुन तुळजापूर तालुक्यातील
नंदगाव येथिल युवा नेते वैभव महादेव पाटील यानी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला. याबाबत परिसरातुन आभिनंदन करुन कौतुक होत आहे.
कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अवाढव्य खर्च न करता.वैभव पाटील यांनी त्यांच्या मित्रासमवेत श्री तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद मुंलाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आल्पोहार व फळे वाटप केले. तर नळदुर्ग येथिल कोविड केअर सेंटर मधिल रूग्णांना फळे वाटप केले. व नंदगाव येथील कोविड सेंटरला ५ लिटर सॕनिटाईझर भेट दिले.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक, रूग्णांनी वैभव पाटील यांचे वाढदिवसानिमित्त सत्कार करून आभार मानले.