कळंब ,दि.१७
संसर्गजन्य कोरोनामुळे सर्वञ हाहाकार उडाला असुन भीषण संकटात शेतकरी हा मोठया संकटात व हलाखीच्या परिस्थितीत आहे. शेतीसाठीचे खत व इंधन दरवाढ केलेली ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या वर्षांपासून लॉकडाऊनमुळे भाजीपाला ,फळे व इतरही धान्याची बाजारपेठ उपलब्ध होत नाही.तर इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढला असून अवेळी झालेल्या पावसाने शेतातील पिके जमीनदोस्त झालेली आहेत.म्हणून खत व इंधन दरवाढ रद्द करावी या मागणीचे निवेदन अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी यांना तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ मे रोजी देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे नमुद केले आहे की, खरिप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ केलेली असल्यामुळे शेतकऱ्यांवर खत आणि बियाणासाठी पैसे नसल्याने मोठी आर्थिक आडचण येणार आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, प्रदेश कार्यकारिणीचे प्रा.डॉ. संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस, भास्कर खोसे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, शहराध्यक्ष मुत्सद्दीक काझी,पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेश काँग्रेसचे शंतनु खंदारे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव हगारे,तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित खोसे,त्रिंबक मेनकुदळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.