बेंबळी, दि. 17
करजखेडा ता. उस्मानाबाद शिवरातील शेतात एकास मारहाण करून खुन केल्याची घटना घडली असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मयतची पत्नी योगीता पेंडपाले यांनी दिल्यावरून पोलिसात दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुणवंत सिध्दलिंग पेंडपाले वय 35 वर्षे, रा. गणेशनगर, औसा, लि. लातूर (ह.मु. करजखेडा) हे करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील महादेव नारायण सुरवसे यांच्या ‘किसानवाडा ढाबा’ येथे वेटर म्हणुन कामास होते. दि. 15.05.2021 रोजी 18.00 वा. सु. करजखेडा गट क्र. 89 मधील शेतात महादेव सुरवसे यांसह भैय्या महादेव सुरवसे या दोघांनी अज्ञात कारणावरुन गुणवंत पेंडपाले यांना मारहाण करुन त्यांचा खून केला व गुणवंत यांचा मृतदेह अन्य ठिकाणी ठेउन पुरावा नष्ट केला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- योगिता पेंडपाले यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.