काटी,दि.१७ : 
तुळजापूर तालुक्यातील काटी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश पांगे वय (65) यांचे सोमवार दि.26 रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले होते. पतीच्या अचानक जाण्याने   पत्नी केशर यांना जिव्हारी लागली होती. पतीच्या या निधनाने धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी केशर  प्रकाश पांगे वय (60 यांचेही अवघ्या 21 दिवसांनी हृदय विकाराच्या धक्क्याने  निधन झाल्याने काटीसह परिसरात  हळहळ व्यक्त होत आहे. 

सोमवारी सायंकाळी 8:30 वाजता येथील चिंचुबाई मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top