उस्मानाबाद, दि. 17 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 17 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 547जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज दिवसभरात 769 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 49 हजार 503 इतकी झाली आहे. यातील 42 हजार 923 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 121 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5 हजार 459 जणांवर उपचार सुरु आहेत