तुळजापूर , दि. १८
बाजार समितीचे सहसचिव कुलदीप भीमराव पवार (३८) यांचे सोमवार (दि. १७) सायंकाळी ०८:३० च्या सुमारास उस्मानाबाद येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांचा पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी मोतीझरा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवार रोजी बाजार समितीतील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून कुलदीप पवार यांचा श्रध्दांजली वाहिली.