उस्मानाबाद,दि.१८ :
द्रौपदीबाई नरोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दैनिक जनमतचे संपादक महादेव नरोटे यांच्या त्या मातोश्री होत.
दि १७ मे रोजी पहाटे ५.३० वा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय १०७ होते. त्यांच्या पार्थिवावर केमवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे, नातसूना, परतुंडे असा परिवार आहे.