लोहारा, दि.१०:
लोहारा येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, व कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचा लोहाऱ्याचे तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते पुष्पतगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
लोहारा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अतिरिक्त कोव्हीनड केअर सेंटर येथे दि.१० मे रोजी तहसीलदार संतोष रुईकर यांनी भेट देवुन. कोरोनाग्रस्तांशी संपर्क साधुन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपुस केली.
घाबरु नका, प्रशासन आपल्या पाठीशी आहे,असे आधार देवुन नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या कोरोनाग्रस्तांचा पुष्पागुच्छ देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले औषधोपचाराने ठणठणीत बरे झाल्याबद्दल धिर दिला. यावेळी कोरोनाग्रस्तांचे अश्रु अनावरण होऊन त्यांनी वैदयकिय अधिक्षक ,डॉक्टर नर्स व अरोग्यं सेवाकांचे आभार मानले.
तहसीलदार संतोष रुईकर यांनी अरोग्यं सेवक ,अविरतपणे रात्रदिवस रुग्णाची सेवा केल्याबद्दल वैद्यकिय अधिक्षक डॉ. साठे गोविंद, ,डॉ. कोमल मगर , नर्स सगट सपना, शिंदे खंडु इतर अरोग्य सेवकांचे कौतुक करुन भविष्यासतही अशाच कौतुकास्पद कामगीरीची अपेक्षा असल्याचे सांगुन त्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. यावेळी महसुल सहाय्यक भागवत गायकवाड ,ऑपरेटर विनोद जाधव हे होते.