तुळजापूर,दि. २९ : डॉ. सतीश महामुनी

 तुळजापूरचा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्स राखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. 

याप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ आशिष लोकरे यांनी स्वतः  उपस्थित राहून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिले. दिवसभर कोव्हीशिल्ड लसीचा पहिला  डोस देण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी होणारी गर्दी व नागरीकाची गैरसोय लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे यांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेसाठी योग्य नियोजन केल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. 


 ज्या व्यक्तींचे वय  ४५ वर्ष पूर्ण झालेले आहे अशा एकूण ३०० व्यक्तींना 'कोविशिल्ड' लसीचा पहिला डोस देण्यात आला.  याप्रसंगी नागरिकांना कोरोना निर्मुलनासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत माहिती देताना सोशल डिस्टन्स आणि मास्क याचा योग्य वापर करून कोरोना संसर्गापासून बचाव करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना मुख्याधिकारी  लोकरे यांनी केल्या

केंद्र सरकार ,राज्य सरकार आणि  जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे वेळोवेळी सर्व नागरिकांना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करत आहेत. लस सर्व नागरिकांना मिळणार आहे. या काळात शिस्तीने आणि सोशल डिस्टन्स होऊन लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी मुख्याधिकारी यांच्यासमवेथा कार्यालय अधीक्षक  व्ही्.व्ही.पाठक, पथक प्रमुख संदिप जाधव, नगर अभियंता सुशिल सोनकांबळे, अभंग गायकवाड, दत्ता साळूंके, सज्जन गायकवाड  उपस्थित होते.  


 तसेच वैद्यकीय अधिकारी श्रीधर जाधव व त्यांचे सर्व कर्मचारी यांनी या लसीकरण मोहिमेसाठी विशेष परिश्रम घेतले.

 जिल्हाधिकारी यांच्या सुचना नगरपरिषद तुळजापूरचे मुख्याअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांची उपस्थिती आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सर्व उपाययोजना केल्या आणि त्या अनुषंगाने उपस्थितांमध्ये जनजागृती केली.
 
Top