नळदुर्ग , दि.20
तुळजापूर तालुक्यातील केशेगाव ता. येथिल नाटय कलाकार आनंद बिराजदार वय ४५ वर्ष यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1मुलगी असा परिवार आहे.
बुधवार दि.१९ मे रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर हैद्राबाद महामार्गावरील तांदुळवाडीच्या पुढे क्रिती गोल्डजवळ चक्कर येवुन पडल्याने तातडीने आनंद बिराजदार यास उपचारासाठी दाखल केले असता डाँक्टरानी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित केल्याची माहिती भिमाशांकर घंटे यानी सांगितले . बिराजदार यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.