नळदुर्ग , दि.22 :
 वाढदिवसानिमित्त होणारा  अनाठाई खर्च  टाळून  नळदुर्ग शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमर  तानाजीराव भाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मधील रूग्ण व आरोग्य कर्मचा-यांना अल्पोपहार व भोजन देवून वाढदिवस साजरा केला. 



शुक्रवार दि. 21 मे रोजी अमर भाळे यांनी वेगळया पध्दतीने वाढदिवस साजरा केल्याने हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. 


 कोरोनाच्या प्रादुर्भावाने रूग्ण संख्या वाढल्यामुळे  नळदुर्ग येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.  याठिकाणी  सध्या ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. या कोविड सेंटरला शहरांतील अनेकांनी आपापल्या परीने मदत करीत आहेत.  दि. २१ मे रोजी नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते, पक्षीमित्र, वृक्षमित्र, अमर भाळे यांनी   वाढदिवस घरातच साधेपणाने साजरा करून अनावश्यक खर्चाला फाटा दिला.  त्यांनी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना अल्पोपहार व भोजन  दिले. 


यावेळी  सामजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, डॉ. आंबेडकर इंग्लिश स्कुलचे  मारुती खारवे, जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, पत्रकार विलास येडगे, लतिफ शेख, शंकर भाळे, नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन डॉ. कुटे  यांच्याकडे  अल्पोपहार व भोजन,  पाण्याचे बॉक्स सुपूर्द केले. 
यावेळी भिमाशंकर बताले यांनी अमर भाळे यांचा सत्कार केला. 

वाढदिवसानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार शिवाजी नाईक, उत्तम बणजगोळे,  तानाजी जाधव, परिचारिका सुमन फुले यासह व्यासनगर येथील  जय हिंद तरुण मंडळ,  शहरातील पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती समितीचे सदस्य, विविध मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
 
Top