तुळजापूर, दि. ११ :

पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना लस देण्यासाठी स्वतंत्र दिवस देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याकडे पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन ताकमोघे यांनी निवेदनात केली आहे.

सदरील निवेदनात असे म्हटले आहे कीझ covid-19 महामारी च्या काळामध्ये गेल्या वर्षापासून पत्रकार, छायाचित्रकार आणि व्हिडिओ ग्राफर हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना विषयी जनजागृती आणि माहिती वृत्तसंकलन करून जनतेपर्यंत दररोज चालणाऱ्या घडामोडी या बातमी च्या स्वरूपात देण्याचे काम पत्रकार करत आहेत.  वृत्तसंकलन करत असताना अनेक पत्रकारांनी या  महामारीत कोरोनाची लागण होऊन आपला जीवही गमावला आहे. या महामारीच्या काळामध्ये जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांना लसीकरणासाठी स्वतंत्र एक दिवस द्यावा आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण पूर्ण करावे, अशी विनंती पत्रकार मोघे यांनी केली आहे. 

 
Top